Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tharar Konata
Swapnil Bandodkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
थरार कोणता तुझ्या मनी थरारला?
मनात चांदवा तुझ्या कसा शहारला?
तुला जरासे समीप घेतले मी
हळूच जेव्हा तुला विचारले मी
"तुझा हा आरसा खरा कि सांग मी खरा?"
"कशात पाहशील तू तुझा हा चेहरा?"
हे कधी कळे ना कोणती आवडे मला तुझी अदा
जी आता तुझी मी पाहतो, जीव होई त्यावरी फिदा
हे कधी कळे ना कोणती आवडे मला तुझी अदा
जी आता तुझी मी पाहतो, जीव होई त्यावरी फिदा
लागलो तुझ्या नशेत मी झुलाया
बोलती हे सारे, "वेडा झाला, गेला वाया"
थरार कोणता तुझ्या मनी थरारला?
Hey, मनात चांदवा तुझ्या कसा शहारला?
राहुनी तुझ्या सभोवती मी किती तुला न्याहाळतो
आणि मग तुला हवे तसे नेमके मी तेच बोलतो
राहुनी तुझ्या सभोवती मी किती तुला न्याहाळतो
आणि मग तुला हवे तसे नेमके मी तेच बोलतो
लागलो तुला मजेत गुणगुणाया
बोलती हे सारे, "वेडा झाला, गेला वाया"
थरार कोणता तुझ्या मनी थरारला?
Hey, मनात चांदवा तुझ्या कसा शहारला?
तुला जरासे समीप घेतले मी
हळूच जेव्हा तुला विचारले मी
थरार कोणता तुझ्या मनी थरारला?
Hey, मनात चांदवा तुझ्या कसा शहारला?
तुला जरासे समीप घेतले मी
हळूच जेव्हा तुला विचारले मी