Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Lallati Bhandar
Ajay-Atul
,
Ajay Gogavale
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, हे
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
नदीच्या पान्यावर आंगीनं फुलतं
नदीच्या पान्यावर आंगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, हे
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
(नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू)
(हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू)
(देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम-क्रोध परतुनि लाव तू)
(काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू)
डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, हे
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
(यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर)
(निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं)
(हे, पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर)
(आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर)
आहा
खणा-नारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ वरीन
आई सांभाळ-सांभाळ कुशीत लेकराला
आई सांभाळ-सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी, हे
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
(यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर)
(निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं)
(हे, पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर)
(आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर)