Skip to content

Zali Phule Kalyanchi

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

जेव्हा, जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली जेव्हा, जेव्हा तिची नी माझी... दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले —आभाळ सांडलेले कैफात, कैफात काजव्यांची अन पालखी निघाली झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली जेव्हा, जेव्हा तिची नी माझी... केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता —आवेग अंध होता वेड्या, वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली जेव्हा, जेव्हा तिची नी माझी... नव्हतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे नव्हतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे —स्पर्शात लाख तारे ओथंबला, ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली जेव्हा, जेव्हा तिची नी माझी...