Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Pahilich Bhet Zaali
Suman Kalyanpur
,
Arun Date
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
पहिलीच भेट झाली...
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही...
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
जादू अशी घडे ही...
पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न राहिले मी...
माझी न राहिले मी, किमया अशी कुणाची?
जादू अशी घडे ही...
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
जादू अशी घडे ही...
डोळे मिटुन घेता दिसतेस तू समोर
डोळे मिटुन घेता दिसतेस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन नाचतात मोर
फुलवून पंख स्वप्नी अन नाचतात मोर
झाली फुले सुगंधी...
झाली फुले सुगंधी माझ्या ही भावनांची
जादू अशी घडे ही...
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
जादू अशी घडे ही...
लाजून वाजती या अंगातूनी सतारी
लाजून वाजती या अंगातूनी सतारी
ऐश्वर्य घेऊनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया...
मी लागले बघाया स्वप्ने ही मीलनाची
जादू अशी घडे ही...
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
जादू अशी घडे ही...
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन या प्रीतीची कहाणी
या प्रीतीची कहाणी
पहिलीच भेट झाली...
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही...
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
जादू अशी घडे ही...