Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Anjanichya Soota
Mahendra Kapoor
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हे, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
हे, दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
अरे, हादरली ही धरणी, थरथरले आसमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
हे, द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
हे, तळहातावर आला घेऊनी पंचप्राण
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
हे, सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका रे डंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
अरे, दैत्य खवळले सारे, परि हसले बिभिषण
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
अरे, उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
हे, दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
अरे, हादरली ही धरणी, थरथरले आसमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
हे, आले किती, गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
हे, धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
अरे, घे बोलावून, आता कंठाशी आले प्राण
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
अहो, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
हे, राम, लक्ष्मण, जानकी, जय बोला हनुमान की
हे, राम, लक्ष्मण, जानकी, जय बोला हनुमान की
हे, राम, लक्ष्मण, जानकी, जय बोला हनुमान की
हे राम
हे राम
हे राम
बोलो राम भक्त हनुमान की जय