Skip to content

Kheltana Rang Bai Holicha

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा फाटला गं, कोणा माझ्या चोळीचा आम्ही तरण्या गं पोरी, जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी, उडविली ती पिचकारी घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा फाटला ग, कोणा माझ्या चोळीचा झणी पाऊल अवघडलं,आणि काळीज धडधडलं काय सांगु मी पुढलं, क्षणातच सारं घडलं जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा फाटला ग कोणा माझ्या चोळीचा मला काही समजंना, मला काही उमजंना त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा फाटला गं, कोणा माझ्या चोळीचा