Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Te Nayan Bolale Kahi Tari
Suman Kalyanpur
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
ते नयन बोलले काहीतरी
ते नयन बोलले काहीतरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी
निळ्या नभापरी किंचित निळसर
निळ्या नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघता-बघता मी ही क्षणभर
झाले गं बावरी, झाले गं बावरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी
क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे?
क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे?
तनुकोमल या वेलीवरले
फूल फुले अंतरी, फूल फुले अंतरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी
मला हवे जे अतिमोहक ते
मला हवे जे अतिमोहक ते
कसे अचानक जुळुनी येते?
सांगाया मज लाज वाटते
संभ्रमात क्षणभरी, संभ्रमात क्षणभरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी