Padaravarti Jartaricha Mor
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा
आई मला नेसव शालू नवा
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा
आई मला नेसव शालू नवा
बांधिला सैलसर बुचडा मानेवरी
माळला सुरंगी गजरा गं त्यावरी
मोकळ्या बटा ह्या रुळती भाळावरी
केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
आई मला नेसव शालू नवा
आई मला नेसव शालू नवा
डोळ्यात रेखिले काजळ मऊ झोंबते
कानात घातले लोलक मी लोंबते
फिरफिरुन माझी मी अईन्याशी थांबते
गोऱ्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा
आई मला नेसव शालू नवा
आई मला नेसव शालू नवा
मज पहावयास येतील गं कोण ते?
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणास त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई उरी या घुमतो गं पारवा
आई मला नेसव शालू नवा
आई मला नेसव शालू नवा
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा