Skip to content

Tu Ahes Na

Jasraj Joshi feat. Avadhoot Gupte, Rahul Deshpande, Adarsh Shinde & Rohit Raut
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

तू आहेस ना तू आहेस ना तू आहेस ना जरी हाथ हाथी तुझा धुक्यासारखा स्पर्श हा पुन्हा एकदा सांग ना आहेस ना कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना तू आहेस ना तू आहेस ना अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा तू आहेस ना तू आहेस ना तू आहेस ना (आहेस ना) (आहेस ना) तू आहेस ना (आहेस ना) (आहेस ना)