Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bhetate Ti Ashi
Avadhoot Gupte
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
ती खळखळून हसते, श्वास किनकीनु लागतो
ती काहीबाही बोलते, प्राण गुणगुणू लागतो
ती खळखळून हसते, श्वास किनकीनु लागतो
ती काहीबाही बोलते, प्राण गुणगुणू लागतो
कोण जाणे असे काय होते मला?
कोण जाणे असे काय होते मला?
जीव गुंतून जातो पुन्हा
तिचा भास होतो मना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
(I miss you in my mind, yeah everytime)
(Smile's on my face, fragrance in my breath)
(I miss you in my mind yeah everytime)
ती अशी कि तशी, ती बघावी तशी
ती खरी कि कुणी कविकल्पना
ह्या तिच्या चाहुली माझिया पाऊली
ती हवीहवीशी अशी वेदना
नाव तिचे हे कुठे कुठे गिरवू मी?
काय तिला किती किती मिरवू मी?
रे मना सांग ना
बोल ना, सांग ना रे मना
ती भिरभिरुन जाते, श्वास थरथरू लागतो
ती काहीबाही बोलते, प्राण गुणगुणू लागतो
कोण जाणे असे काय होते मला?
जीव गुंतून जातो पुन्हा, तिचा भास होतो मना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते, कधी पहिल्या ही विना
मी स्वतःला किती वेगळा वाटतो
ज्या क्षणी जानवे ती मला
बोलता बोलता हरवतो मी कुठे?
शोधतो मी तिला कि मला
गंध तिचा हा कासाकाय विसरू मी
सांग मला कुठेकुठे विखरू मी?
रे मना सांग ना
बोल ना, सांग ना रे मला
ती दरवळून जाते, श्वास मंतरु लागतो
ती काहीबाही बोलते, प्राण गुणगुनू लागतो
कोण जाणे असे काय होते मला?
जीव गुंतून जातो पुन्हा, तिचा भास होतो मना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
(I miss you in my mind, yeah everytime)
(Smile's on my face, fragrance in my breath)
(I miss you in my mind, yeah everytime)