Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Raja Shivaji Anthem Chhatrapati (pagalall.com)
Ajay Gogavale
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हे, हर-हर-हर महादेव शिवशंकर
सह्यगिरी शिखरावर आले
हे, सळ-सळ-सळ रणकंटक तलवारी
वज्रमूठ सरसावून भाले
तू तेजःपुंज झुंजार, चेतवून अंगार
भेदलास अंधार सारा
तू अर्थ रामराज्याचा, हिंदवी स्वराज्याचा
एकमेव आराध्य झाला
दुष्ट दुर्जनांसी संहारले (हे)
पातशाहीला तू ललकारले (हे)
एक नव्या पर्वाची एकजूट करण्यासी
एक छत्र छाया आधार दे
एक शस्त्र, एक अस्त्र शूरवीर छत्रपती
धैर्यशील, सत्वशील, धर्मनिष्ठ छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे (हे-हे)
माय भवानीचा तू वाघ रे
कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत छत्रपती
अद्वितीय क्षत्रियकुलावतंस छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे
माय भवानीचा तू वाघ रे
देव, देश, धर्माची, सर्वश्रेष्ठ कर्माची
आन घेतली रक्त सांडले जरी
अंधकार शतकांचा भस्मसात करण्यासी
एक तप्त ज्वाला ही पेटली उरी
भक्ती रूप संतांचा, साधू अन महंतांचा
हात जोडूनी मान राखलास तू
जर कुणी स्वराज्यावर वाकडी नजर केली
हात-पाय चौरंगी छाटलास तू
मोडून जात-पात रयतेसी देई साथ
त्यांचा सदैव कैवारी झाला
झाले बहुत राजे, जगतात नाव गाजे
लाखात एक शिवराय माझा
हात तुझा पाठीशी, वार झेलू छातीशी
ढाल तुझी होण्याचा मान दे
एक शस्त्र, एक अस्त्र शूरवीर छत्रपती
धैर्यशील, सत्वशील, धर्मनिष्ठ छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे (हे-हे)
माय भवानीचा तू वाघ रे
कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत छत्रपती
अद्वितीय क्षत्रियकुलावतंस छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे
माय भवानीचा तू वाघ रे
मावळ-मावळ, पाठीशी बारा मावळ
देवाला शोधाया धावून आलं राऊळ
देवा रं देवा, सारं पावन झालं रं
आरती ओवाळा माझं राजं आलं रं
तोरण बांधून साजरं हे करू औक्षण कुंकुम भाळावर
शिवबांना डोळा पाहीन अन डोळ सारं पाणावलं
साष्टांग दर्शनाचा ह्या देवपूजनाचा
हा दैवयोग भाग्यात यावा
ध्वज उंच-उंच भगवा हा, वंदनीय भगवा हा
आसमंत भगवा कराया
जन्म सार्थ करण्यासी प्रार्थना ही चरणासी
प्राण अर्पण्याचा सन्मान दे
एक शस्त्र, एक अस्त्र शूरवीर छत्रपती
धैर्यशील, सत्वशील, धर्मनिष्ठ छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे (हे-हे)
माय भवानीचा तू वाघ रे
कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत छत्रपती
अद्वितीय क्षत्रियकुलावतंस छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे
माय भवानीचा तू वाघ रे