Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Yad Lagla
Ajay - Atul
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
याड लागलं गं याड लागलं गं
रंगलं तुझ्यातं याड लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाड लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं
याड लागलं गं याड लागलं गं
रंगलं तुझ्यात याड लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाड लागलं गं
सांगवंना बोलवंना
मन झुरतंया दुरून
पळतंया कळतंया
वळतंय मागं फिरून
सजलं गं धजलं गं
लाजं काजंला सारलं
येंधळं ह्ये गोंधळंलं
लाडंलाडं ग्येलं हरुन
भाळलं असं उरात पालवाया लागलं
हेऽऽ ओढ लागली मनात चाळवाया लागलं
याड लागलं गं याड लागलं गं
सुलगंना उलगंना
जाळ आतल्या आतला
दुखनं ह्ये देखनं गं
एकलंच हाय साथीला
काजळीला उजळंलं
पाजळून ह्या वातीला
चांदनीला आवतान
धाडतुया रोज रातीला
झोप लागंना सपान जागवाया लागलं
पाखरू कसं आभाळ पांघराया लागलं