Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Abhimanane Meera Vadate
Kunda Bokil
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
अभिमानाने मीरा वदते
अभिमानाने मीरा वदते
हरिचरणांशी माझे नाते
हरिचरणांशी माझे नाते
गोकुळातला मुरलीवाला
गोकुळातला मुरलीवाला
मुरली घुमवित स्वप्नी आला
जादुगार तो श्याम सावळा
जादुगार तो श्याम सावळा
त्याच्यासाठी मी ही नाचते
अभिमानाने मीरा वदते
हरिचरणांशी माझे नाते
रुणुझुणु-रुणुझुणु पैंजण बोले
रुणुझुणु-रुणुझुणु पैंजण बोले
जिवा-शिवाचे नाते जुळले
जिवा-शिवाचे नाते जुळले
सुख-दुःखाचे बंधन तुटले
सरले माझे इथले नाते
अभिमानाने मीरा वदते
हरिचरणांशी माझे नाते
उपहासाने खुशाल बोला
उपहासाने खुशाल बोला
अमृत गमते जहर ही मजला
भजनी-गायनी जीव रंगला
भजनी-गायनी जीव रंगला
मूकभावना अर्थ शोधते
अभिमानाने मीरा वदते
हरिचरणांशी माझे नाते
हरिचरणांशी माझे नाते