Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Dev Devharat
Sudhir Phadke
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई?
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी-सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूता ठायी
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव मूर्तीत ना मावे, तिर्थक्षेत्रात ना गावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही देव भरुनिया राही
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव स्वये जगन्नाथ, देव अगाध, अनंत
देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी