Skip to content

Ya Ithe Laxmana Bandh Kuti

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

नौका गंगा पार झाली वनवासी श्रीराम भार्या आणि बंधू यांच्यासह पुढे मारग्रस्त झाली वाटेतील दिवस चालण्यामधे आणि रात्री कुठेतरी वृक्षाखाली पर्णक्षय्येवर झोपून अयोध्येचं स्मरण करण्यामध्ये त्यांनी व्यथित केल्या एका सायंकाळी ते भरंद्वाज मुलींच्या आश्रमामधे पोचले भरंद्वाजांनी त्याचं यथोचित स्वागत केलं आणि वास्तव्यासाठी चित्रकुट पर्वत योग्य असल्याचं सांगितलं चित्रकुटाला जाण्याचा मार्गही पण त्यांनी त्यांना कथन केला त्यांचा निरोप घेऊन श्रीराम पुढं निघाले वाटेमधे जानकी अनेक अनोळखी फळांच्याविषयी विचारत होती श्रीराम जिज्ञासा पुरवीत होते लक्ष्मण फुलांचे गुच्छ गुंफून वाहीनींच्या हाती देत होता असाच वनविहार करीत करीत ते तिघंही चित्रकुट पर्वतावर पोचले तिथल्या एका सबाक आणि मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम लक्षमणाला म्हणाले या इथें, लक्ष्मणा बांध कुटी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी या मंदाकिनिच्या तटनिकटीं या मंदाकिनिच्या तटनिकटीं या इथें, लक्ष्मणा बांध कुटी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी चित्रकूट हे, हेंच तपोवन येथ नांदती साधक, मुनिजन सखे जानकी करि अवलोकन ही निसर्गशोभा भुलवि दिठी ही निसर्गशोभा भुलवि दिठी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी पलाश फुलले, बिल्व वांकले भल्लातक फलभारें लवले दिसति न यांना मानव शिवले दिसति न यांना मानव शिवले ना सैल लतांची कुठें मिठी ना सैल लतांची कुठें मिठी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी किती फुलांचे रंग गणावे? कुणा सुगंधा काय म्हणावें? मूक रम्यता सहज दुणावें येतांच कूजनें कर्णपुटीं येतांच कूजनें कर्णपुटीं या इथें, लक्ष्मणा बांध कुटी कुठें काढिती कोकिल सुस्वर? निळा सूर तो चढवि मयूर रत्नें तोलित निज पंखांवर रत्नें तोलित निज पंखांवर संमिश्र नाद तो उंच वटीं संमिश्र नाद तो उंच वटीं या इथें, लक्ष्मणा बांध कुटी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी शाखा-शाखांवरी मोहळे मध त्यांच्यांतिल खाली निथळे वन संजीवक अमृत सगळे वन संजीवक अमृत सगळे ठेविती मक्षिका भरुन घटीं ठेविती मक्षिका भरुन घटीं या इथें, लक्ष्मणा बांध कुटी हां सौमित्रे, सुसज्ज, सावध दिसली, लपली क्षणांत पारध हां सौमित्रे, सुसज्ज, सावध दिसली, लपली क्षणांत पारध सिद्ध असूं दे सदैव आयुध सिद्ध असूं दे सदैव आयुध या वनीं श्वापदां नाहिं तुटी या वनीं श्वापदां नाहिं तुटी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी जानकिसाठी लतिका, कलिका तुझिया माझ्या भक्ष सायकां जानकिसाठी लतिका, कलिका तुझिया माझ्या भक्ष सायकां उभय लाभले वनांत एका उभय लाभले वनांत एका पोंचलों येथ ती शुभचि घटी पोंचलों येथ ती शुभचि घटी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी जमव सत्वरी काष्ठें कणखर उटज या स्थळीं उभवूं सुंदर जमव सत्वरी काष्ठें कणखर उटज या स्थळीं उभवूं सुंदर शाखापल्लव अंथरुनी वर शाखापल्लव अंथरुनी वर रेखुया चित्र ये गगनपटी रेखुया चित्र ये गगनपटी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी या मंदाकिनिच्या तटनिकटीं या मंदाकिनिच्या तटनिकटीं या इथें, लक्ष्मणा बांध कुटी या इथें, लक्ष्मणा बांध कुटी