airneechya_deva
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
रणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आबाळागत माया तुजी आमावरी र्हाउं दे
लेऊं लेनं गरिबीचं
चनं खाऊं लोखंडाचं
जिनं व्हावं आबरूचं
धनी मातुर माजा देवा, वाघावानी आसुं दे
लक्षुमीच्या हातातली
चवरी व्हावी वरखाली
इडापीडा जाइल, आली-
किरपा तुझी, भात्यातल्या सुरासंगं गाउं दे!
सुख थोडं, दु: ख भारी
दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी
सोसायाला, झुंजायाला, अंगी बळ येऊं दे!