Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Manachya Dhundhit
Sachin Mulye
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना
सखे गं साजणी, ये ना
जराशी लाजत, मुरडत ये ना
सखे गं साजणी, ये ना
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना
सखे गं साजणी, ये ना
चांदणं रूपाचं आलंय भरा
मुखडा तुझा गं अती साजरा
माझ्या शिवारी ये तूं जरा
चारा घालीन तुज पाखरा
माझे डोळे शिणले गं, तुझी वाट पाहुनी गं, ये-ये-ये
सुखाची उधळीत बरसात ये ना
सखे गं साजणी, ये ना
जराशी लाजत मुरडत ये ना
सखे गं साजणी, ये ना
आतां कुठवर धीर मी धरू
काळीज करतंय बघ हुरुहुरू
सजणे नको गं मागं फिरू
माझ्या सुरांत सूर ये भरुं
माझे डोळे शिणले गं, तुझी वाट पाहुनी गं, ये-ये-ये
वसंती वाऱ्यांत तोऱ्यात ये ना
सखे गं साजणी, ये ना
जराशी लाजत मुरडत ये ना
सखे गं साजणी, ये ना
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना
सखे गं साजणी, ये ना
सखे गं साजणी, ये ना
सखे गं साजणी, ये ना