Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Kuni Tari Bolava Dajibala
Sudhir Phadke
,
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मी तर जाते जत्रंला, गाडीचा खोंड बिथरला
बरं नाही घरच्या गणोबाला
कुणीतरी, अहो, कुणीतरी बोलवा दाजिबाला
हो, कुणीतरी बोलवा दाजिबाला
दाजिबा सारखा दिर दुनियेमध्ये नाही
गोर्या भावजयीची त्यांना लई अपूर्वाई
त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई
हेंद्रट आमच्या नशिबाला
हेंद्रट आमच्या नशिबाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला
कुणीतरी, अहो, कुणी तरी बोलवा दाजिबाला
हो, कुणीतरी बोलवा दाजिबाला
हो, कुणीतरी बोलवा दाजिबाला
दाजिबांचा स्वभाव लई गुलहौशी
सजवतील घोडा सांगितल्यासरशी
मला पुढ्यात घेतील हसून चटदिशी
निघता-निघता उशीर झाला
निघता-निघता उशीर झाला
कुणी तरी बोलवा दाजिबाला
कुणीतरी, अहो, कुणी तरी बोलवा दाजिबाला
हो, कुणीतरी बोलवा दाजिबाला
दाजिबा म्होरं घोड्यावर बसल्या-बसल्या
अंगाला अंग लागतं, अन् होती गुदगुल्या
बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या
मी लई भुलते रुबाबाला
मी लई भुलते रुबाबाला
कुणी तरी बोलवा दजिबाला
कुणीतरी, अहो, कुणी तरी बोलवा दाजिबाला
हो, कुणीतरी बोलवा दाजिबाला
साज शिणगार केला, ल्याले साखळ्या तोडे
ऐन्याची घातली चोळी अन् जरीचे लुगडे
अशा मध्ये असावे संगे दाजिबा तगडे
दाजिबा तगडे, दाजिबा तगडे
म्होरं मग ठाउक जोतिबाला
म्होरं मग ठाउक जोतिबाला
कुणी तरी बोलवा दाजिबाला
कुणीतरी, अहो, कुणी तरी बोलवा दाजिबाला
हो, कुणीतरी बोलवा दाजिबाला