Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ashadhacha Saghan
Avanti Nerurkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
आषाढाच्या सघन घनासम
साजन अवचित आला गं
आषाढाच्या सघन घनासम
साजन अवचित आला गं
बेसावध मी असतानाही
बेसावध मी असतानाही
बरसून अलगद गेला गं
आषाढाच्या सघन घनासम
साजन अवचित आला गं
अंधाराला गंध जुईचा
जीव त्यावरी झुलला गं
अंधाराला गंध जुईचा
जीव त्यावरी झुलला गं
बंधन सुटता वाऱ्यावरती
बंधन सुटता वाऱ्यावरती
देह मोकळा फुलला गं
आषाढाच्या सघन घनासम
साजन अवचित आला गं
कचबंधी या नकळत कोणी
हिरवा मरवा चुरला गं
कचबंधी या नकळत कोणी
हिरवा मरवा चुरला गं
भान उडाले शेजेवरती
भान उडाले शेजेवरती
व्याकूळ, आतुर उरला गं
आषाढाच्या सघन घनासम
साजन अवचित आला गं
सहजच कळले अगतिक होऊन
ह्रदयातून बावरला गं
सहजच कळले अगतिक होऊन
ह्रदयातून बावरला गं
शृंगाराच्या रसरंगातून
शृंगाराच्या रसरंगातून
देहमिठीने निवला गं
आषाढाच्या सघन घनासम
साजन अवचित आला गं
बेसावध मी असतानाही
बेसावध मी असतानाही
बरसून अलगद गेला गं
आषाढाच्या सघन घनासम
साजन अवचित आला गं
साजन अवचित आला गं
साजन अवचित आला गं