Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Maj Bhetuni Ja Ho
Mahesh Hiremath
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मज भेटूनी जा हो, दत्तसख्या, अवधूता
मज भेटूनी जा हो, दत्तसख्या, अवधूता
मज भेटूनी जा हो, दत्तसख्या, अवधूता
का तुम्ही कमंडलू विसरून आला इथे?
प्रिय श्वान आज ते तुम्हासवे का नसे?
काखेची झोळी ती विसरून गेला कुठे?
काखेची झोळी ती विसरून गेला कुठे?
परि तुम्हास पुरते ओळखीले मी आता
मज भेटूनी जा हो, दत्तसख्या, अवधूता
किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले
किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले
हृदयीचे भावही व्यथितपणे कळविले
इंद्रियास दमूनी चित्ताला वळविले
इंद्रियास दमूनी चित्ताला वळविले
का उगाच असली सत्वपरीक्षा घेता?
मज भेटूनी जा हो, दत्तसख्या, अवधूता
किती सुयोग, सुंदर भेटीचा मज दिला
ना वियोग तुमचा कधी घडावा मला
सर्वस्व भाव मी चरणी तंव वाहिला
सर्वस्व भाव मी चरणी तंव वाहिला
मन रंगुनी गेले गुरूराया, ये आता
मज भेटूनी जा हो, दत्तसख्या, अवधूता
मज भेटूनी जा हो, दत्तसख्या, अवधूता