Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Reshami Reshami
Gaurav Dagaonkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हे खरे कि स्वप्न माझे
का खुणावे मला नाते हे?
मी जगाया लागलो अन
वेड तू लावले का असे?
हे खरे कि स्वप्न माझे
का खुणावे मला नाते हे?
मी जगाया लागलो अन
वेड तू लावले का असे?
रेशमी-रेशमी चाहुली या नव्या
रेशमी आपल्या सावल्या
रेशमी-रेशमी श्वास आहे नवा
रेशमी बावऱ्या जाणिवा
ओंजळ सुखाची वाहे भरुनी
आहेस माझ्या सोबत म्हणुनी
ओंजळ सुखाची वाहे भरुनी
आहेस माझ्या सोबत म्हणुनी
दोघात गहिरे आतुर काही
आता उदासी बाकी ना राही
रेशमी-रेशमी चांदण्यांचा दिवा
रेशमी कोणता हा दुवा?
रेशमी-रेशमी श्वास आहे नवा
रेशमी बावऱ्या जाणीवा, ओ-ओ
रस्त्याने साऱ्या फितुरी करावी
नजरेत थोडी माया उरावी
रस्त्याने साऱ्या फितुरी करावी
नजरेत थोडी माया उरावी
हलकेच राहावे ऊन अंतराचे
आपुल्या मिठीची सर पाझरावी
रेशमी-रेशमी हा दुरावा हवा
रेशमी आपला कारवा
रेशमी-रेशमी श्वास आहे नवा
रेशमी बावऱ्या जाणिवा