Skip to content

Pandharicha Vaas Chandrabhage Snan

Bhimsen Joshi
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥ हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी । मागणें श्रीहरी नाहीं दुजें ॥२॥ मुखीं नाम सदा संतांचें दर्शन । जनीं जनार्दन ऐसा भाव ॥३॥ नामा ह्मणे तुझें नित्य महाद्वारीं । कीर्तन गजरीं सप्रेमाचे ॥४॥