Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Mala Pahuni Hasalis
Mandar Apte
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मला पाहुनी हसलीस जेव्हा...
मला पाहुनी हसलीस जेव्हा हसल्या कुंदकळ्या
धुक्यात दडलेल्या वाटा ही झाल्या मनमोकळ्या
मला पाहुनी हसलीस जेव्हा हसल्या कुंदकळ्या
शेलाटी जणू वेलांटी तु आलीस गं मंदिरी
हसू उमटले प्रसन्नतेचे प्राजक्ताच्या उरी
परतून गेली...
परतून गेली संथ पाऊले, विरल्या सर्व खुणा
पान खुनीचे, मोर पिसाचे अजुनी भुलवी मना
मला पाहुनी हसलीस जेव्हा हसल्या कुंदकळ्या
आली अवचित पुन्हा पाखरे भिरभिरला गं थवा
मागे वळुनी पुन्हा पाहशी विभ्रम मजला नवा
पुरे-पुरे हे...
पुरे-पुरे हे आढे-वेढे लपनडाव फसवा
तुझी लोचणे फितूर झाली, विफल तुझा रुसवा
मला पाहुनी हसलीस जेव्हा हसल्या कुंदकळ्या
धुक्यात दडलेल्या वाटा ही झाल्या मनमोकळ्या
मला पाहुनी हसलीस जेव्हा हसल्या कुंदकळ्या