Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Swami Smaran
Shubhangii Kedar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
आधार हो तुम्ही, स्वामी
श्वासात तुमचा निवास
उपकार तुमचे, स्वामी
बनू तुमचाच दास
तुमच्या पायी गंगा वाही
जीवनाला मिळे दिशा
तुमची चाहूल ठायी-ठायी
आनंदाचा हा फुले वसा
(आधार हो तुम्ही, स्वामी)
(श्वासात तुमचा निवास)
(उपकार तुमचे, स्वामी)
(बनू तुमचाच दास)
करितो पूजन स्थिरावून मन
सद्गुरू तुम्ही स्वामी
सेवेत तुमच्या देह करू दान
नित्य भजन करु, स्वामी
तुमच्या चरणी लावतो माथा
तुम्हीच आमचे नाथ
संपवी संकट देऊन दिशा
तुमच्या कृपेची साथ
(अचूक आम्हा दाखवी वाट)
(सारं काही तुम्हा ज्ञात)
(बापासम तुम्ही थोपवी पाठ)
(दिला मायेचा हात)
स्मरण तुमचे स्वामी
क्षणाक्षणाला मनात
तेजोमय तुम्ही स्वामी
तुमचचं रूप डोळ्यात
(आधार हो तुम्ही, स्वामी)
(श्वासात तुमचा निवास)
(उपकार तुमचे, स्वामी)
(बनू तुमचाच दास)
तंनसुया नंदना तुज ओवाळू आरती
तंनसुया नंदना मज नीज चरणी दे अंति
सर्वात्मा तू आहे नीज देवा तू माऊली
करशी स्नान नित्य प्रेमे काशीपुरी
तंनसुया नंदना तुज ओवाळू आरती
तंनसुया नंदना मज नीज चरणी दे अंति
दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो