Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Mana Manav Va Parmeshwar
Sudhir Phadke
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
माना मानव वा परमेश्वर
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा
भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा
दैवजात दुःखानी मनुजा पराधीन केले
दैवजात दुःखानी मनुजा पराधीन केले
त्या पतितांचे, त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले
भूषण रामा एकपत्निव्रत
भूषण रामा एकपत्निव्रत, मला नको तसले
मोह न मजला कीर्तीचा, मी नाथ अनाथांचा
मोह न मजला कीर्तीचा, मी नाथ अनाथांचा
भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा
रुक्मिणी माझी सौंदर्याची
रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा
किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा
तरीही वरितो सहस्त्र सोळा
तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला
पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा
पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा
भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा
कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
कर्तव्याला मुकता माणूस
कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहलाते प्राशुन शंकर
हलाहलाते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो
जगता देण्या संजीवन मी
जगता देण्या संजीवन मी कलंक आदरितो
वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा
वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा
भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा