Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Karuya Udo Udo Ambabaicha
Pralhadh Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
घेऊया लाभ दर्शनाचा (उदो-उदो)
करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
साऱ्या जनतेची आई, माता अंबाबाई
हाकेला उभी राही, सारं काही तीच्या ठायी
सत्य डोळ्यांनी पाही, दंड दुष्टांना देई
अनेक रूपे तीही घेई भक्तांच्या पायी
आश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी
आश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी
होतो जयघोष माऊलीचा (उदो-उदो)
करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
तेथुनी जरा दुरी स्वामीची गगनगिरी
अंश तो परमेश्वरी, भक्ती दत्ताची खरी
गुहेत स्थान जरी, बाजुला खोल दरी
रूप ते त्यांचे जणू शिवशंकरापरी
भेटुया त्यांना चला, पाहू ईश्वरी लीला
भेटुया त्यांना चला, पाहू ईश्वरी लीला
भरे दरबार भाविकांचा (उदो-उदो)
करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
डोंगरी माथ्यावर जोतिबांचे मंदिर
जुळती दोन्ही कर पहाल मूर्ती जर
असे हे कोल्हापूर नवरात्रीला फार
करिती देवींचा तो उत्सव घरोघर
सोहळा मनोहर, रम्य तो खरोखर
सोहळा मनोहर, रम्य तो खरोखर
सुटे मधुगंध चंदनाचा (उदो-उदो)
करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
घेऊया लाभ दर्शनाचा (उदो-उदो)
करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)
(करुया उदो, उदो, उदो अंबाबाईचा)