Skip to content

Uttung Amuchi Uttar Seema

Shahir Liladhar Hegde
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच-उंच चढवू (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला (परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला) हे कोटी-कोटी भुजदंड होतील इथे ध्वजदंड (हे कोटी-कोटी भुजदंड होतील इथे ध्वजदंड) छातीची करु दे ढाल... छातीची करु दे ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) बलवंत उभा हिमवंत करी हैवानांचा अंत (बलवंत उभा हिमवंत करी हैवानांचा अंत) हा धवलगिरी, हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा (हा धवलगिरी, हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा) जरी झुंड-पुंड शत्रूंची आली खिंड-खिंड अडवू (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार (देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार) ह्या नसा-नसातील रक्त जाळील आसुरी तख्त (ह्या नसा-नसातील रक्त जाळील आसुरी तख्त) आम्ही न कुणाचे दास... आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच-उंच चढवू (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू) (उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)