Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tuzya Gala Mazya Gala
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
ताई आणखी कोणाला?
चल रे दादा चहाटळा
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
तुज कंठी, मज अंगठी
आणखी गोफ कोणाला?
तुज कंठी, मज अंगठी
आणखी गोफ कोणाला?
वेड लागले दादाला
वेड लागले दादाला
मला कुणाचे ताईला
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
तुज पगडी, मज चिरडी
आणखी शेला कोणाला?
तुज पगडी, मज चिरडी
आणखी शेला कोणाला?
दादा सांगू बाबांना
दादा सांगू बाबांना
सांग तिकडच्या स्वारीला
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
खुसू-खुसू गाली हसू
वरवर अपुले रुसू-रुसू
खुसू-खुसू गाली हसू
वरवर अपुले रुसू-रुसू
चल निघ येथे नको बसू
चल निघ येथे नको बसू
घर तर माझे तसू-तसू
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
कशी-कशी आज अशी
गंमत ताईची खाशी
कशी-कशी आज अशी
गंमत ताईची खाशी
आता कट्टी फू दादाशी
आता कट्टी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी?
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा