Mala He Dattaguru Disale
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले
माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळुनी
माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान विचारी
पायावर झुकले
(मला हे दत्तगुरू दिसले)
(मला हे दत्तगुरू दिसले)
चरण शुभंकर फिरता तुमचे
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू
स्वानंदे फिरले
(मला हे दत्तगुरू दिसले)
(मला हे दत्तगुरू दिसले)
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्यासाठी
औदुंबर वसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले