Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Uthi Uthi Gopala
Pt. Kumar Gandharva
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
मलयगिरीचा चंदन गंधीत
धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला
पूर्व दिशेला गुलाल उधळून
पूर्व दिशेला गुलाल उधळून
ज्ञानदीप लाविला
ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनी अवघे गोधन
गोरस अर्पुनी अवघे गोधन
गेले यमुनेला
धूप, दीप, नैवेद्य असा हा
धूप, दीप, नैवेद्य असा हा
सदुपचार चालला
स्वीकारावी पूजा आता
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला
रांगोळ्यांनी सडे सजविले
रांगोळ्यांनी सडे सजविले
रांगोळ्यांनी सडे सजविले
रस्त्या-रस्त्यातुन
सान पाऊली वाजती पैंजण
सान पाऊली...
सान पाऊली वाजती पैंजण
छुनुछुनु, छु-छुन
कुठे मंदिरी ऐकू येते
कुठे मंदिरी ऐकू येते
टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते
एकतानता कुठे लाविते
एकतानता कुठे लाविते
एकतारिची धून
एकतारिची धून
निसर्गमानव तुझ्या स्वागता
निसर्गमानव तुझ्या स्वागता
असा सिद्ध जाहला
स्वीकारावी पूजा आता
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला
राजद्वारी झडे चौघडा
राजद्वारी झडे चौघडा
राजद्वारी झडे...
राजद्वारी...
राजद्वारी झडे चौघडा
शुभःकाल जाहला
शुभःकाल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा
सागरतीरी ऋषीमुनींचा
वेदघोष चालला
सागरतीरी ऋषीमुनींचा
वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवी मुरली
वन वेळूंचे वाजवी मुरली
छान सूर लागला
आ, तरुशिखरावर कोकिल कविने
पंचम स्वर लाविला
स्वीकारावी पूजा आता
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला
उठी-उठी गोपाला