Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Kalya Matit Matit
Anuradha Paudwal
,
Suresh Wadkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
काळ्या मातीत-मातीत तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
इज थय-थय नाचते, ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो
काळ्या मातीत-मातीत तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
सदाशिव हाकारतो नंदीबैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते, वाट राघूची पाहते
राघू तिफन हानतो, मैना वाटुली पाहते
काळ्या मातीत-मातीत तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
सर्जा रं माझ्या, ढवळ्या रं माझ्या
पवळ्या रं माझ्या, आ-हा
झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती-डोलती जनू करती भजन
गव्हा-जोंधळ्यात तवा सोनं-चांदी लकाकते
तशी चांदी लकाकते, कपाशी फुलते
काळ्या मातीत-मातीत तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
चालं ऊन-पावसाचा पाठ शिवनीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपानं पाहतो
डोळा सपानं पाहतो, काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतता, हो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं, हिरवं सपानं फुलतं
काळ्या मातीत-मातीत तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
इज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो
काळ्या मातीत-मातीत तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते