Skip to content

Bhalari

Balasaheb Shinde
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

घे भलरी घे, भलरी घे,भलरी घे घे भलरी घे, भलरी घे,भलरी घे घे गड्या घे भलरी घे आर घे गड्या घे भलरी घे म्हणू का नको म्हण म्हण गड्या आर म्हणू का नको म्हण म्हण गड्या भलरी दादा,भलरी दादा म्हाताऱ्या राजाची म्हातारी राणी काळया आईला मोटचं पाणी मोटच्या पाण्याव चांदाच रूप चांदाच्या रूपाव कशाची कळी, कशाची कळी, कशाची कळी म्हाताऱ्या राणीच्या गालाची खळी म्हणू का नको म्हण म्हण गड्या म्हणू का नको म्हण म्हण गड्या भलरी दादा, हा ssss कसं भुललं शिवार रानच्या गारव्याला कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला पीक फुलोरा फुलोरा डोहाळा सुगीचा लागला पिंगा घालतोया भुंगा नाद मोहराचा लागला कसं इरलं आभाळssss कसं इरलं आभाळ, डोंगराच्या दरीला कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला हु हु हू हु हू झुलतोया झुलतोया झुलतोया वाऱ्यासंग येल गोंदणीचा कसा पाण्यामंदी गेला बाई तोल पारंबीचा दिस सरला सरला,भर नवतीला आला लाज आली गालावर,पदर केसराचा झाला आला पिरतीचा उबाळा हो sss आला पिरतीचा उबाळा वारा चाटी धरणीला कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला घे गड्या घे भलरी घे घे गड्या घे भलरी घे म्हणू का नको म्हण म्हण गड्या आर म्हणू का नको म्हण म्हण गड्या भलरी दादा, हे भलरी दादा, हा हे भलरी दादा हेsss हेsss हेsss हेsss हेsss हा भलरी हाsss