Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Natha Ghari Nache Maza Pandurang
Jitendra Abhisheki
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल
उंबरठ्यासी कैसे शिऊ? आम्ही जातिहीन
उंबरठ्यासी कैसे शिऊ? आम्ही जातिहीन
रूप तुझे कैसे पाहू? त्यात आम्ही दीन
रूप तुझे कैसे पाहू? त्यात आम्ही दीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल
वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू
वाळवंटी गाऊ, वाळवंटी गाऊ
वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग-अंग न्हाऊ
चंद्रभागेच्या पाण्याने अंग-अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल, अबीर गुलाल
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोखा म्हणे नाम घेता
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर