Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Rupas Bhalalo Mee
Sudhir Phadke
,
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लावले तू, सांगू नको कुणाला
रूपास भाळलो मी...
एकांत पाहुनिया जे तू मला म्हणाला
ऐकून लाजले मी, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...
हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून, आ
हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून
पाण्या, अशीच ठेवी छाया उरी धरून
धरलेस जे उरी ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळलो मी...
हा लाजरा शहारा पाहील काय कोणी?
हा लाजरा शहारा पाहील काय कोणी?
करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही?
गालात रंगले जे, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...
रूपास भाळलो मी...