Skip to content

Kaahi Bolayache Aahe

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही