Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aata Kasali Chori Ga
Sudhir Phadke
,
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
त्याची-माझी प्रीत अलौकीक
त्याची-माझी प्रीत अलौकीक
दिशा जाणती चारी गं
आता कसली चोरी गं?
आता कसली चोरी गं?
तो नगरीचा झाला राजा
मी म्हणते पण, "केवळ माझा"
त्याच्या भवती धरिती फेरा
स्वप्ने माझी सारी गं
आता कसली चोरी गं?
आता कसली चोरी गं?
फुलात दिसती त्याचे डोळे
सुगंधात सहवास दरवळे
स्मरणे त्याच्या घेई लालिमा
कांती माझी गोरी गं
आता कसली चोरी गं?
आता कसली चोरी गं?
वावरता मी त्याच्या मागे
पदा-पदावर सुदैव जागे
सप्तपदीला विलंब का मग?
तोरण विलसो दारी गं
आता कसली चोरी गं?
आता कसली चोरी गं?