Radha Hi Bawari
Popularity · Low
Listen
YouTube
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण, विसरून भान ही वाट कुणाची बघते?
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण, विसरून भान ही वाट कुणाची बघते?
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी
हिरव्या-हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंबचिंब देहावरूनी श्रावनधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रीतीचे गाणे सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे कि सत्य म्हणावे राधा हरकून जाई
हा चंद्र-चांदणे ढगा आडूनी प्रेम तयांचे पाही