Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Kahi Kalena
Rohit Raut
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
पहिली नजर, पहिलीच भेट
काय सांगून गेली? काय देऊन गेली?
प्रेम की फक्त मैत्री
काही कळे ना, काही कळे ना
तरी वाटते हवे हे हरवून जाणे
की असावेत हे मनाचेच खेळ सारे
भान हरपून जावे, काय याला म्हणावे?
प्रेम की फक्त मैत्री काही कळे ना
काही कळे ना, काही कळे ना
कधी नव्हे ते का वाटतो
उगाच चंद्र हा हासल्या सारखा
कधी नव्हे ते टक्क जागतो
उगाच रात्रभर एकटा मी आता
खुळ्यासारखे हे शोधणे बहाने
तुझ्याच आस-पास राहण्याचे
हे असे काय घडते? (I just wanna know)
काय याला म्हणावे? (let me be strong)
प्रेम की फक्त मैत्री काही कळे ना
काही कळे ना, काही कळे ना
तुझा हलका स्पर्श सांगून जातो
तुझ्याच सोबतीचा करार मी करावा
कधी जरा कुठे तोल जाता
तुझाच हात माझ्या हाती असावा
असे वाटणे आता रोजचे
कुठे, कधी, कसे मी व्यक्त व्हावे?
गुंतल्या या जिवाने (I just wanna know)
कोणते अर्थ घ्यावे? (let me be strong)
प्रेम की फक्त मैत्री काही कळे ना
काही कळे ना, काही कळे ना