Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bajaar Phulancha Bharala
Sudhir Phadke
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसे ना
मज बहीण मिळे ना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसे ना
ही प्रीत जगाची खोटी
मज बहीण मिळे ना
मज बहीण मिळे ना
बहीण मिळे ना
बहीण मिळे ना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसे ना
मज एक हवी ती माया
वणवणतो फिरतो वाया
मी कुठवर चालत राहू?
का मार्ग सरे ना?
मज बहीण मिळे ना
बहीण मिळे ना
बहीण मिळे ना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसे ना
हातात फुलांचा गजरा
वखवखल्या कामुक नजरा
या दलदल चिखलामधुनी
का कमळ फुले ना?
मज बहीण मिळे ना
बहीण मिळे ना
बहीण मिळे ना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसे ना
का आज तमाशा बघता?
उघड्यावर अब्रू विकता
का किडे होऊनी जगता?
का जगता-जगता मरता?
या जगण्या-मरण्या मधला
मज अर्थ कळे ना
मज बहीण मिळे ना
बहीण मिळे ना