Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Angai (Neej Re)
Rohit Raut
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
विझून गेला दिवस कधीचा
विरघळल्या छाया
विझून गेला दिवस कधीचा
विरघळल्या छाया
घुमू लागली गर्द रात्रीची
काजळली काया
नीज रे, नीज, जागू नको वाया
नीज रे, नीज, जागू नको वाया
चोरपावली तुझ्याचसाठी
नीज उतरू दे पापण काठी
कुणास ठाऊक काय गोंदलं
सटवाईनं तुझ्या ललाटी
कूस उतावीळ अजून माझी
पाझरते माया
नीज रे, नीज, जागू नको वाया
नीज रे, नीज, जागू नको वाया
मीट लोचने रे लडिवाळा
थांबव आता हा चिमणा चाळा
तुझ्याचसाठी ऐक वाजतो
रात किड्यांचा हा घुंगुरवाळा
निळ्या-सावळ्या डोही लागला
चांद ही वितळाया
नीज रे, नीज, जागू नको वाया
नीज रे, नीज, जागू नको वाया