Skip to content

Pachole Aamhi Pachole

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

पाचोळे, आम्ही हो पाचोळे काय कुणासी देऊ, काय कुणाचे घेऊ? वणवण भटके वनांतले पाचोळे आम्ही वादळांतले कधी भरारी अथांग गगनी केव्हा न कळे येतो अवनी मोहपाश ना आम्हां कुणाचा स्वैर अम्ही आपुले तरलो त्या प्रक्षुब्ध सागरीं आणि उतरलो दरी-कपारी वसुंधरेचे स्वरूप आम्ही तेहि दुरुन देखिले इतुके अमुचे असुनी काही वैर कुणाशी कसले नाही कसेही असो अम्ही मानतो जीवन अमुचे भले