Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Visaruni Kshana
Bela Shende
Popularity · Low
+
Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
विसरुनी क्षण जुने, तू नव्याने भेट ना
सांडले सुख किती वेचुनी तू आन ना
धावले सारखे शोधण्या मी मला
तुजविना हरवला अर्थ श्वासातला
ये पुन्हा सावराया मला
विसरुनी क्षण जुने, तू नव्याने भेट ना
उत्तरे जेव्हा मिळाली, प्रश्न होते वेगळे
प्रश्न बनुनी उत्तरांनी वैर का हे साधले?
दिवस झाले वजा एकमेकाविना
वळून पाहू जरा साथ देशील ना
ये पुन्हा सावराया मना
विसरुनी क्षण जुने, तू नव्याने भेट ना
कुशीत तुझिया हळूच यावे
निजवावे शांत तू
अंतरीच्या स्पंदनांचे गीत आपण गुनगूनू
जपून मी ठेवला आठवांचा ठसा
निसटला काळजा परत आणू आता
ये पुन्हा सावराया मला
विसरुनी क्षण जुने, तू नव्याने भेट ना