Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Saanjh Jhali Tari
Sadhana Sargam
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते
अशी एकाकी मी, एकाकी, अशी एकाकी मी, एकाकी
अशी एकाकी मी माझी मला, माझी न मी उरते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते
घाई जगण्याची अशी दाटली गर्दी भवती
घाई जगण्याची अशी दाटली गर्दी भवती
आणि रस्त्यात भर उन्हात तुझा हात सुटला
थकले मी, थकले मी
थकले मी धावुनी, सावलीचा पाठलाग करते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते
साद ना पोहचली माझी कधी हृदयास तुझ्या
साद ना पोहचली माझी कधी हृदयास तुझ्या
मी कितीदा तुझ्या वळणावरी कण्हले होते
ते तुझे दु:ख आता...
ते तुझे दु:ख आता संध्याकाळी सोबत करते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते
धागे तुटले जरी स्वप्ने तुझी विणता-विणता
धागे तुटले जरी स्वप्ने तुझी विणता-विणता
ती वीण आजही छातीतली निरगाठ आहे
ही नजर आजही तू नेलेल्या दिवसात भिडते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते
अशी एकाकी मी, एकाकी, अशी एकाकी मी, एकाकी
अशी एकाकी मी माझी मला, माझी न मी उरते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते
सांज झाली तरी...