Skip to content

Na Kalata

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

नं कळता आज वाटेवरी, वळले नि तो भेटला? परीकथा हीच वाटे खरी कळले नं काही मला पावलो-पावली हो जशी सावली तो तसा सोबती चालला सोबती चालता, मी उगी बोलता भाबडा हात-हाती दिला नं कळता आज वाटेवरी, वळले नि तो भेटला? पारखा तो जरी आपलासा मला भासला संपला मन-मनी आज दोघातला फासला जाहले मी जरी कावरी-बावरी चालले सोबतीने पुन्हा सोबती चालता, मी उगी बोलता भाबडा हात-हाती दिला नं कळता आज वाटेवरी, वळले नि तो भेटला? बोलला तो जरी सूर माझ्या मनी जागला हासला तो जरी 'छंद' माझ्या मनी लागला पाहता-पाहता काय झाले मला! स्वास ही आज वेडावला सोबती चालता, मी उगी बोलता भाबडा हात-हाती दिला नं कळता आज वाटेवरी, वळले नि तो भेटला?