Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bhatukalichya Khela Madhali Raja Anik Rani
Arun Date
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
भातुकलीच्या खेळामधली
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
राजा वदला, "मला समजली
शब्दांवाचुन भाषा"
राजा वदला, "मला समजली
शब्दांवाचुन भाषा"
माझ्या नशिबासवे बोलती
तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळा तेव्हा
दाटुनी आले पाणी?
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
राणी वदली बघत एकटक
दूर-दूरचा तारा
राणी वदली बघत एकटक
दूर-दूरचा तारा
"उद्या पहाटे दुसऱ्या वाटा
दुज्या गावचा वारा"
"दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली
पण राजाला उशिरा कळली
गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
तिला विचारी राजा
"का हे जीव असे जोडावे?"
तिला विचारी राजा
"का हे जीव असे जोडावे?"
"का दैवाने फुलण्याआधी
फूल असे तोडावे?"
तिला विचारी राजा
"का हे जीव असे जोडावे?"
"का दैवाने फुलण्याआधी
फूल असे तोडावे?"
या प्रश्नाला उत्तर नव्हते
या प्रश्नाला उत्तर नव्हते
राणी केविलवाणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
का राणीने मिटले डोळे?
दूर-दूर जाताना
का राणीने मिटले डोळे?
दूर-दूर जाताना
का राजाचा श्वास कोंडला?
गीत तिचे गाताना
गीत तिचे गाताना
वाऱ्यावरती विरून गेली
वाऱ्यावरती विरून गेली
एक उदास विराणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी