Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ghar Jawai Karal Ka
Jaywant Kulkarni
,
Sudhir Phadke
,
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
लाल दिसे तो लोखंडावर घाव घणाचे घाला
लाल दिसे तो लोखंडावर घाव घणाचे घाला
जमली माया तोवर, राया, पुसा आमच्या बा ला
तुम्ही आम्हाला जावई कराल का?
तुम्ही आम्हाला घर-जावई कराल का?
तिची नी माझी प्रीती, तरीपण वाटते भीती
हो, तिची नी माझी प्रीती, तरीपण वाटते भीती
तुम्ही द्यावा टेकू, नाहीतर आम्ही बघू
तुम्ही द्यावा टेकू, नाहीतर आम्ही बघू
हात जोडतो, पाया पडतो
अहो, हात जोडतो, पाया पडतो
मव्हाळ काहीतरी बोला
तुम्ही आम्हाला जावई कराल का?
तुम्ही आम्हाला घर-जावई कराल का?
अवघड भारी काम तुम्हा कितीच फुटला घाम
अवघड भारी काम तुम्हा कितीच फुटला घाम
छातीचा झाला फाता अन उगीचं मारता बाता
ही ना गम्मत, धरून हिम्मत
ही ना गम्मत, धरून हिम्मत
आवर्जून द्या टोला, टोला, टोला
तुम्ही आम्हाला जावई कराल का?
तुम्ही आम्हाला घर-जावई कराल का?
लाल दिसे तो, लोखंडावर घाव घणाचे घाला
लाल दिसे तो लोखंडावर घाव घणाचे घाला
जमली माया तोवर, राया, पुसा आमच्या बा ला
तुम्ही आम्हाला जावई कराल का?
तुम्ही आम्हाला घर-जावई कराल का?
तू तर राणी दिडशहानी (काय?) चुकलो-चुकलो
तू तर राणी चतुर, शहानी
घडवून आणीन मीच कहाणी
तू हो आगे (left-right, left-right)
मी तुझ्या मागे (left-right, left-right)
तू हो आगे, मी तुझ्या मागे
समोर जाऊन, तुझ्या मागे राहून
समोर जाऊन, तुझ्या मागे राहून
मीच विचारीन त्याला, त्याला, त्याला
तुम्ही आम्हाला जावई कराल का? बापरे!