Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Mala Ek Chanas Hava
Usha Mangeshkar
,
Mahendra Kapoor
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
लपवू नका, छपवू नका
धरलंया हातात काय दावा?
की माझ्या लाडक्या जिवा, पिरतीचा ठेवा
रानातनं आणलाय रानमेवा
जरा मला दावा, आधी मला एक chanas हवा
देतो रानमेवा, पर मला एक chanas हवा
देतो रानमेवा, अगं मला एक chanas हवा
लिंबाच्या गारव्याला जाऊया
अन हळूहळू रानमेवा खाऊया
Hey, लिंबाच्या गारव्याला जाऊया
अन हळूहळू रानमेवा खाऊया
अरे, नको बाबा, कोणीतरी पाहिलं
थांबा जरा झाडाच्या आडाला राहूया
चल केळीच्या फडात, घेईन मी पुढ्यात
झोंबू नका अंगाला दूर जावा, जरा दूर जावा
पर मला एक chanas हवा, जरा दूर जावा
आधी मला एक chanas हवा, जरा दूर जावा
अगं मला एक chanas हवा
नदीच्या किनारी बसूया
मनातल्या मनात हसुया
Hey, नदीच्या किनारी बसूया
अन मनातल्या मनात हसुया
पाण्यातली मासळी बघलं मला
चला बांबूच्या बेटात घुसूया
झालो मी राजी अन होशील का माझी?
येऊ नका घाईला दम खावा, जरा दम खावा
आधी मला एक chanas हवा, जरा दम खावा
पर मला एक chanas हवा, जरा दम खावा
अगं, मला एक chanas ह-ह-ह-हवा
मऊमऊ गवतावर झोपुया
अन पिरतीचा गुलकंद चाखूया
Hey, मऊमऊ गवतावर झोपुया
अन पिरतीचा गुलकंद चाखूया
असं नका वागू तुम्ही जणांमध्ये
थोडी मनाची लाज तरी राखुया
अगं, पुरे ही तऱ्हा अन जातो मी घरा
थांबा नका जाऊ नामदेवा, माझ्या नामदेवा
मग मला एक chanas हवा, नको नामदेवा
अगं, थोडासा chanas हवा, ओरे नामदेवा
मला एवढाच chanas हवा, देते नामदेवा
Hmm, आता सगळाच chanas हवा, घ्या हो नामदेवा
आता सगळाच chanas हवा, घ्या हो नामदेवा
आता सगळाच chanas हवा...