Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Dattaguruchi Aarti
R.N. Paradkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
त्रिगुणा त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेती नेती शब्द न ये अनुमाना
अखंड समाधी ध्यान मुनिजना
जय देव, जय देव जय श्री गुरुद्त्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता, जय देव, जय देव
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान
हारपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोलवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान, जय देव, जय देव
जय देव, जय देव जय श्री गुरुद्त्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता, जय देव, जय देव
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली अम्हां आदिकरूनि काशी
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
गुरुमहाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
गुरुमहाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरु
गुरुमहाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
रुप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरु
गुरुमहाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
आत्मारामी राम जात गोपाल करुणाकरू
गुरुमहाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
जय जय परब्रह्म सद्गुरु
जय जय परब्रह्म सद्गुरु